
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आर आर आर या चित्रपटाच्या ऑस्करवारीची जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटाला ऑस्कर भेटावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा होती. त्यात नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर अखेर आज हा आर आर आर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे.

पुरस्कार सोहळ्या दरम्यान गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देखील केला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे मंचावर गेले आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातूनच नाही तर संपूर्ण जगभरातुन आर आर आरच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑस्करचा पुरस्कार स्वीकारताना किरवाणी यांनी अनोख्या स्टाईलने केलेल्या संभाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. ऑस्करची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर किरवाणी यांनी मंचावर भाषण दिलं. यावेळी सर्वांना त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. या भाषणाची खास बात म्हणजे किरवाणी यांनी आपले भाषण हे गाण्याच्या चालीत म्हटलं ज्याचे सर्वांनाच नवल वाटले.भाषणादरम्यान किरवाणी म्हणाले,”माझी एकच इच्छा होती. आर आर आरला जिंकायचंय, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे आणि ते मला सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल” यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. किरवाणी यांनी हे सारे शब्द सुरांमध्ये गुंफून म्हटल्याने सर्वांना नवल वाटले.
