एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीचं आगळ – वेगळं आंदोलन…

आटपाडी : पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलं.

या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली होती. अखेर या आंदोलनाची दखल घेत संबंधित एसटी कर्मचाऱ्याला आजची रजा मंजूर करण्यात आली आहे. तसंच पत्नीने आपलं आंदोलन देखील मागे घेतलं आहे.विलास कदम हे 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवेत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी त्यांनी आगारप्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र सुटी नाकारल्याने पत्नी नलिनी कदम यांनी आगारप्रमुखांच्या केबिनबाहेर अंथरुण टाकून आंदोलन सुरु केलं होतं. आंदोलनाची माहिती मिळताच सांगलीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आटपाडी आगारात येऊन आंदोलक महिलेची भेट घेतली.

🤙 8080365706