
दुधाला आंबवून तयार केलेला पदार्थ म्हणजे योगर्ट. चला तर मग जाणून घेऊया उत्तम आरोग्यासाठी योगा चांगले की दही?

योगर्ट हा पदार्थ चवीला आंबट गोड जरी असला तरी, आपल्या आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. याचा शोध तुर्कीमध्ये लागला असून, त्याचे नाव योगर्ट पडले. योगर्ट हे एक आरोग्यदायी प्रोबायोटिक आहे. त्यात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
दह्यात उच्च दर्जाचे प्रथिने आढळते, ज्यामुळे अन्न लवकर पचते. यासह त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरससह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. हे सर्व पोषक घटक भूक नियंत्रणात ठेवतात. ज्यामुळे वजन लवकर कमी होऊ लागते.दही आणि योगर्ट तयार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. बहुतांश घरांमध्ये दही, हिरवी मिरची आणि लिंबू इत्यादी गरम दुधात घालून दही तयार केले जाते, ज्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. दुसरीकडे योगर्ट कृत्रिम किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्यामुळे त्याची चव आणि पोत अगदी वेगळे आहे.शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दररोज योगर्ट खा. दिवसातून किमान २ ते ३ कप योगर्ट खावे. त्यातील पौष्टीक घटकामुळे शरीराला उत्तम फायदे मिळतात. यासह भूक कमी लागेल. ज्यामुळे कॅलरीज कमी होतील.
