महाराष्ट्रात पावसाची शक्यता…..

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व विभागांत मंगळवार ते गुरुवार (ता. १४ ते १६) या कालावधीत पावसाची शक्यता निर्माण होईल.

कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांत ५ ते १४ मि.मी. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता राहील.मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, धाराशीव, लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यातील काही दिवशी ५ ते २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे.मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत काही दिवशी १५ मि.मी., तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत ८ ते २३ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

🤙 8080365706