सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव आजपासून….

कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार १२ ते २० मार्चअखेर संपन्न होत आहे.

भंडारा उत्सव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.रविवारी सायंकाळी सात वाजता विणा पूजनाने यात्रेस प्रारंभ होईल.समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे.शनिवारी १८ मार्च रोजी श्रींचा जागर होईल.

रविवार १९ मार्च रोजी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होईल.काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद, सोमवारी २० मार्च रोजी दिवसभर पालखी सोहळा होईल.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळूमामा देवालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

🤙 8080365706