पाठदुखीसारखी समस्या या उपायांनी ठेवा दूर

पाठदुखीसारखी सामान्य वाटणारी पण सतत छळणारी समस्या दूर व्हावी यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आज आपण अगदी झटपट होणारे आणि पाठीचा मणका, कंबर, खांदे यांच्या दुखण्यापासून आराम देणारे सोपे  व्यायामप्रकार  पाहणार आहोत.

बालासन करण्यासाठी वज्रासनात बसावं. कमरेतून समोर झुकावं. डोकं जमिनीला टेकवावं. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून समोर लांब/ सरळ ठेवावेत. छातीनं मांड्यांवर दाब द्यावा. हे आसन करताना मंद गतीनं श्वसन सुरु ठेवावं. बालासन केल्यानं पाठ आणि कंबरेच्या तक्रारी दूर होतात. पाठ, कंबर, खांद्यांमधील आखडलेपणा दूर होतो. मेंदू, मन शांत होऊन स्मरणशक्ती वाढण्यास याची चांगली मदत होते.मार्जरासन करताना गुडघ्यावर बसावं.  पुढच्या दिशेने झुकून दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. खांदे आणि मांड्या ताठ ठेवाव्यात. दीर्घ श्वास घेत मान वर करुन आकाशाकडे पाहावं. मान उंच करताना पाठ जमिनीच्या दिशेने खाली न्यावी. श्वास सोडत मान जमिनीच्या दिशेनं खाली करावी आणि पाठ वर उचलावी. हे असं किमान दहा वेळा करावं. पवनमुक्तासन म्हणजे दोन्ही पाय पोटावर घेऊन ते दाबतो. त्यामुळे पोटातील गॅसेस बाहेर येण्यास मदत होते. इतकेच नाही तर पाठीच्या मणक्याला यामुळे आराम मिळण्यास मदत होते. यामध्ये डावीकडे आणि उजवीकडे वळायचे, त्यामुळे पाठ जमिनीवर घासली जाते आणि पाठीला चांगला मसाज होतो. 

🤙 8080365706