मुश्रीफ कुटुंबीयांची तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी

कागल : माजी कामगार व ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा छापेमारी केली.सकाळी 7 वाजता इडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली.

अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. ईडीच्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची कसून चौकशी करून सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये आधीपेक्षा अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.

🤙 8080365706