संतप्त मुश्रीफ समर्थकाने डोके आपटून घेतले….

कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा इडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. 11 जानेवारी रोजी पहिल्यांदा इडीने त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती.आज पहाटेच चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ईडीच्या या कारवाईनंतर संतप्त झालेल्या एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला आहे.

सागर दावणे( वय 33 रा. दावणे वसाहत कागल) असे त्याचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे.

🤙 8080365706