
कोल्हापूर :माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पुन्हा ईडीने छापेमारी सुरू केली आहे.

त्यांच्या निवासस्थानी ५ गाड्यातुन आज पहाटे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
