राजमाता जिजाऊ महिला समितीच्या विविध उपक्रमांचा महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उपयोग करून घ्यावा: सौ नवोदिता घाटगे

कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्तच्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणवेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे

महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल :राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा महिलांनी उपयोग करुन घ्यावा. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.

येथील श्रीराम मंदिरमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना बक्षीस वाटप वेळी त्या बोलत होत्या.यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,सौ.नदितादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नंदितादेवी घाटगे यांचा कागलच्या घाटगे घराण्याच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक लिहिल्याबद्दल व सौ विजय निंबाळकर यांची डोंगरी विकास अंमलबजावणी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.सौ. घाटगे पुढे म्हणाल्या, महिलांनी चुल आणि मुल या पारंपरिक संकल्पनेतून बाहेर पडावे. त्यांनी स्वावलंबी व्हावे,यासाठी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण, व्यवसायासाठी अर्थसहाय्य व विक्री व्यवस्था अशा सुविधा उपल्बध करुन दिल्या जात आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, राजमाता जिजाऊ महिला समितीने महिला सक्षमीकरण बरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत.

यावेळी महिलांसाठी फनी गेम्स व कागल संगीत आकादमीचे हिदायत नायकवाडी व सहका-यांचा भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला.यावेळी घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी. पनीर महोत्सव स्पर्धा- पल्लवी धोत्रे, अनुपमा जोशी,दीक्षा रेळेकर ,दिपिका कुलकर्णी, प्रियांका मर्दाने. पारंपरिक वेशभूषा स्पर्धा- नेहा काळेबेरे, स्वप्ना पालणकर,गुणमाला पाटीलमेहंदी स्पर्धा- मुस्कान शेख, मानसी पाटील, पुनम कालेकर, नीलम कागलकर, श्वेतारानी कांबळे. रांगोळी स्पर्धा- प्रियांका खामकर,बालीषा माधव, सृष्टी पाटील, सारिका मिसाळ, स्नेहल परबयावेळी बिद्रीच्या संचालिका निताराणी सूर्यवंशी, सारिका चौगुले, नगरसेविका आनंदी मोकाशी, विजया निंबाळकर,लक्ष्मी सावंत, जयश्री कोरवी, सुधा कदम, नम्रता कुलकर्णी अश्विनी भोसले, शितल घाटगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.स्वागत नंदा गाडेकर यांनी केले .प्रतिभा गजबर यांनी प्रास्ताविक केले.

शितल माने यांनी आभार मानले.चौकट विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री राम मंदिरमधील सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी महिलांनी गर्दीचा उच्चांक केला होता. जागा अपुरी पडल्यामुळे सभागृहाच्या बाहेर ऐनवेळी संयोजकांनी स्क्रीन लावून महिलांची सोय केली.

🤙 8080365706