संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात वाढ…

कागल :आज जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान रक्कमेत रू 500 रुपये ची वाढ करून ती दरमहा रुपये 1500 केलेचे व त्यासाठी रू 2400 कोटी ची तरतूद केलेचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. याबद्दल राज्य सरकार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लाभार्थीच्या वतीने अभिनंदन करतो व आभार मानतो अशी प्रतिक्रिया राजे समार्जीतसिंह घाटगे यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, यापूर्वी फडणवीस सरकारने रू600 ची पेन्शन रू1000 केली. 1000 च्या पेन्शन मध्ये वाढ करून ती 1500 ते 2000 करावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न व पाठपुरावा करत होतो. आजच्या बजेटमध्ये त्याची तरतूद केलेने आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे.मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना कागलचे आमदार मुश्रीफ यांनी या पेन्शनमध्ये वाढ करणार असल्याबाबतच्या बऱ्याच वेळा मोठं- मोठ्या वल्गना केल्या. त्या सर्व पोकळ ठरल्या. हाच त्यांच्या व आमच्यामधील वक्तृत्व आणि कर्तुत्व यामधील फरक आहे.असेही त्यांनी म्हंटले आहे.

🤙 8080365706