सरकारचं बजेट म्हणजे चाट मसाला : राजू शेट्टी

कोल्हापूर : सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प तेवढ्यापुरताच चविष्ट वाटतो पण अंतिमतः हाताला काहीच लागत नाही. सरकारचं हे बजेट म्हणजे चाट मसाला की काय, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर व्यक्त केले आहे.

सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्पा विषयी बोलताना शेट्टी म्हणाले, सहा हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केले पण शेतकऱ्यांना जी रासायनिक खते विकत घ्यावी लागतात त्या खताच्या खर्चामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सतरा ते अठरा हजारांची वाढ झाली आहे. या बदल्यात अर्थमंत्री केवळ सहा हजार रुपये देतात. दहा हजार रुपये शेतकरी यामध्ये तोट्यामध्ये गेला आहे. प्रक्रिया उद्योगाला चालना ही दीर्घकालीन उपाय योजना आहे, याबाबतीत अर्थमंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706