आज सादर झालेल्या बजेटवर राजे समार्जीतसिंह घाटगे यांची प्रतिक्रया

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज पाच मुख्य घटकावर आधारित पंचामृत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा व स्पर्श करणारा आहे.

व विकासाला चालना देणारा व अभ्यासपूर्ण आहे.यामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती, महिला, व घरकुल योजना अशा विविध घटकांचा समावेश आहे . या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. यामधे एक रुपयात पिक विमा या महत्त्वपूर्ण योजनेचा समावेश आहे. गेली काही वर्षे सातत्याने आम्ही मागणी केलेल्या नुसार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन एक हजारवरुन दीड हजार रुपये करण्यात येणार आहे.तसेच महिलांसाठी लेक लाडकी योजना व एसटी प्रवासात महिलांना सरसकट 50 टक्क्यांची सवलत मिळणार अंगणवाडी सेवक, सेविका, शिक्षण सेवक, यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असून नोकरदार महिलांना वस्तीगृहाची सोय याचा सा समावेश करून महिलांचा सन्मान केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे जलयुक्त शिवार २.० ची घोषणा केल्यास दुसऱ्या टप्प्यात ५००० गावांमध्ये सुरू होणार आहे.तसेच मागेल त्याला शेततळे व ठिबक सिंचन संच अशा योजना जाहीर करून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच विद्यार्थी, महिला, गृहिणी शेतकरी कर्मचारी अशा सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार.

🤙 8080365706