बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन.. मनोरंजनसृष्टीवर पसरली शोककळा..!

कोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

यांच्या निधाननं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते.कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले होते.1972 मध्ये दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं.

सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते आणि इथेच त्यांची प्रकृती खालावली. गाडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, पण झटका इतका मोठा होता की सतीश कौशिक यांचे प्राण वाचू शकले नाही.प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. सतीश कौशिक यांच्या  मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे. 

🤙 8080365706