
कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन म्हालसवडे गावात महिलांसाठी हळदी कुंकू,रांगोळी आणि लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन कै.प्रकाश दादू पाटील फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रभावती पाटील होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पवन पाटील यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते. सामजिक विकासामध्ये महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे,आजच्या युवा पिढीने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करुन गावचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन प्रा.पवन पाटील यांनी केले.
यावेळी गावातील गुणवंत कन्येंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये रेखा तुकाराम पाटील( प्रथम क्रमांक),सृष्टी धनाजी पाटील( द्वितीय क्रमांक),सई निवास वरपे (तृतीय क्रमांक)आणि आदिती मारुती पाटील(चतुर्थ क्रमांक)यांना पारितोषक देण्यात आले.
हळदी कुंकू कार्यक्रमानंतर लकी ड्रॉ मधील विजेत्या महिल्यांना मानाची पैठणी तसेच कार्यक्रमास उपस्थित असणार्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी सरपंच संदीप कांबळे, उपसरपंच कुबेर पाटील, ग्रामसेविका संगिता दगडे, शंकर दादू पाटील, प्रियंका पाटील, जयश्री वरुटे ,कविता पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच.टी.कोपार्डे यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले.
