
हातकणंगले तालुका (सुशांत दबडे) : चालत्या एमएच ३५ पी १४९६ सुमो कोथळी येथील दहा ते बारा महिला प्रवाशी सुमो गाडीतून हेरले, मौजे वडगांव येथील नातेवाइकांना भेटून परत कोथळी ता.शिरोळ कडे जात असताना हातकणंगले येथील दत्त सूतगिरणी जवळ गाडी आली असता पुढील भागात असलेल्या महिलेला चालत्या गाडीत ‘नाग’ जातीचा विषारी साप दिसला.

तसे गाडीतील सर्व महिला प्रवाशी घाबरून, साप… साप… म्हणून आरडाओरडा करु लागल्या पण गाडी चालक सचिन सुरपुसे यांनी प्रसंगावधान राखून गाडी नियंत्रणात घेऊन थांबवली व सर्व महिला प्रवाशांना गाडीबाहेर उतरविले. चालक सुरपुसे हे सर्पमित्र असल्यामुळे त्या सापाला चपळाईने बाहेर काढून शेतात सोडून सापासह गाडीतील प्रवाशांना जीवदान दिले. उष्माघात वाढल्यामुळे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.
