स्वतःचे ध्येय ठरवून वाटचाल करा : मधुकर पाटील

तिटवे : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे ध्येय ठरवा, त्या क्षेत्रातील आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करा आणि याशावी व्हा. आपल्या देशाला आणि राज्याला असंख्य कर्तुत्वान महिलांची परंपरा लाभली आहे, त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्याच आदर्शाच्या जोरावर आजच्या या युवतींनी समाजापुढे आपला आदर्श निर्माण व्हावा, असे कर्तुत्व करायला हवे. आणि तुमच्याकडे कर्तुत्व असेल तर जग तुमचे नेतृत्व स्वीकारातेच असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध व्याख्याते आणि शिवाजी विद्यापीठ, सिनेट सदस्य मधुकर पाटील यांनी दिला.

येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘महिलांचे अधिकार’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. शुभांगी भांदिगरे यांनी केले. ते पुढे म्हणाले, चांगले विचार आत्मसात करून, त्याप्रमाणे वागणूक केल्यास आपला देश आणखी एक वेगळी उंची गाठू शकतो.

आज जगातील प्रत्येक क्षेत्र स्त्रियांना खुणावत आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही वादळे आली तरी त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करत राहा. कर्तुत्व गाजवायचे असेल तर कष्ट करायची तयारी ठेवा. रस्त्यातील अडथळे बाजूला सारत पुढे चालत राहा, आयुष्यात यशस्वी होऊन आईवडिलांचे आणि संस्थेचे नाव मोठे करा, असे मत याप्रसंगी शहीद शिक्षण प्रसारक अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तृप्ती उणे प्रथम, साक्षी डोंगळे द्वितीय आणि वृषाली पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शहीद महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११० गावांमधील ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे.

विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. हृदयस्पर्श कल्चरल क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष पद्माकर कापसे, राजेंद्र मकोटे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सानिका गुरव हिने केले तर आभार प्रा. शुभांगी भांदिगरे यांनी मानले.

🤙 8080365706