
कोल्हापूर : कसबा बावडा डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला कर्मचारी व विद्यार्थिनीप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महिला सबलीकरण या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आले होते. मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या देश- विदेशातील माजी विद्यार्थिनीनी विद्यार्थिनींशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. मेकॅनिकल क्षेत्रामध्ये महिलांना असलेली संधी आणि त्या संधीसाठी लागणारे मार्गदर्शन माजी विद्यार्थिनींकडून करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थिनी सिमरन नागावकर हिने महिला सबलीकरणाबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
केमिकल विभागात चित्रकला, रांगोळी व रेखाचित्र स्पर्धा, फन गेम व अनलॉक टॅलेंट अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. फ्री विंग फाऊंडेशनच्या संयोगीता महाजन आणि इनरव्हील सनराईजच्या अध्यक्षा सोनाली पटेल यांचे व्याख्यान झाले. कॉम्पुटर सायन्स विभागात मनोरंजक खेळ, हिडन टॅलेंट शो आणि पाककृती स्पर्धा झाल्या. सिव्हिल इंजिनिरिंग विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाच्या उपमुख्य अधिकारी अरुणा हसबे रावराणे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुरेखा आडनाईक, इगल्स ऑटोमेशनच्या संचालिका अनिता चव्हाण- गरुड यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आर्किटेक्चर विभागातही महिला प्राध्यापिका, कर्मचारी व विद्यार्थीनिनी एकत्र केक कापून महिला दिन साजरा केला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के .गुप्ता, प्राचार्य डॉ. एस डी चेडे, रजिस्ट्रार डॉ एल व्ही मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ राजेंद्र रायकर, सांस्कृतिक समनव्यक डॉ राहुल पाटील, डॉ राधिका ढणाल, डॉ सुनील रायकर, डॉ के टी जाधव, डॉ किरण माने, शताक्षी कोकाटे, डॉ ज्योती जाधव, इंद्रजित जाधव, डॉ टी बी मोहिते पाटील, डॉ नवनीत सांगळे एनएसएस समन्वयक योगेश चौगुले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यर्थींनी उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
