श्री पांडुरंग सहकारी पत संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :कोल्हापूर येथील गंगावेश येथील पांडुरंग सहकारी पत संस्थेच्या वतीने आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यासह विविध उपक्रमाचे कार्यक्रमही यावेळी घेण्यात आले .या कार्यक्रमामध्ये विद्या पाटील यांचे महिला जागृती विषयावर व्याख्यान झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या संचालिका कविता पाटील होत्या.

यावेळी संस्थेचे चेअरमन हाजी जहांगीर आत्तार ,व्हा. चेअरमन ए.बी. तोरसे, ज्येष्ठ संचालक ए.आर. शेवडे, दिलशाद आत्तार तसेच संस्थेचे सभासद, हितचिंतक उपस्थित होते.आभार मॅनेजर अर्जुन पाटील यांनी मानले.

🤙 8080365706