मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट

मावळ: तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत आज (मंगळवार, 7 मार्च) दुपारच्या सुमारास बुडून एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

जयदीप पुरुषोत्तम पाटील (मुळ राहणार मु. तारखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आंबी येथील डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता.जयदीप आणि त्याचे सहा-सात मित्र धुलिवंदन खेळून झाल्यावर इंद्रायणी नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते. तेव्हा जयदीप पाटील पाय घसरुन नदीत पडला आणि खोल पाण्यात बुडला. त्याच्या मित्रानी याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तास बोटीच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर जयदीपचा मृतदेह शव हाताशी लागले.

🤙 8080365706