आदमापुरात अपहरण झालेल्या बालकाची पोलिसांनी केली अवघ्या ४८ तासात सुटका

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना ४ मार्चला घडली होती. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या बालकाची सुटका केली आहे.

पोलिसांना तपास करत असताना संशयित दांपत्य पळवून नेलेल्या सहा वर्षाच्या मुलासह मोटार सायकलवरुन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पोलिसांनी या मार्गावरील ९० ते ९५ ठिकाणावरील सीसीटीव्ही, हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा, रेल्वे आणि बस स्थानकांची तपासणी केली. मोहन अंबादास शितोळे (वय ५०) आणि छाया मोहन शितोळे (३०, रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या दांपत्याचे नाव आहे.पोलिसांनी बालकाची सुखरूप रित्या सुटका करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्वतःला मूल नसल्याने संबंधित सहा वर्षाच्या मुलाला त्यांनी चाेरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.पोलिस अधीक्षक शैलश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुन्ह्याची उकल कशी केली याची माहिती दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, गडहिंग्लज उप विभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले.या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गडहिंग्लज डीवायएसपी राजीव नवले, एलसीबी निरीक्षक वाघमोडे, उप निरीक्षक सपाटे उपस्थित होते.

🤙 8080365706