सलग सुट्टयांमुळे महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

कोल्हापूर : शनिवार, रविवार, होळी, धुलीवंदन अशा सलग आलेल्या सुट्टयांमुळे महालक्ष्मी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे.

वाढती गर्दी आणि उष्णतेची वाढती तीव्रता लक्षात घेऊन देवस्थान समितीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडप उभारणी केली आहे. तसेच भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था व मंदिराच्या आवारात सतरंजी अंथरली आहे. भाविकांच्या सोईसाठी पाण्याचा फवारा व गार वारा असणाऱ्या पंख्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल असेही देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.

वातावरणात इतके प्रखर ऊन असूनही महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे. यामुळे बिंदू चौकातील वाहन तळामध्ये वाहनांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे.

🤙 8080365706