
कोल्हापूर : मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट वाढल्यामुळे दरवर्षी पेक्षा या वर्षीचा उन्हाळा कडक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तसेच दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे .वाढत्या उष्णतेमुळे वातावरणात बदल होऊन सर्दी ,ताप, खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील आजचे तापमान 36°cअसून हा पारा 37°c ते 39°c वर जाण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. मार्चमध्ये इतकी प्रखर उष्णता तर एप्रिल – मे मध्ये किती उष्णता असेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान आज पहाटेपासून गार वारा सुरू झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे.
