मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे. याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे. ऐन होळीच्या दिवशी अशी घटना घडल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.

वसंत मोरे यांच्या मुलाला मिळालेल्या धमकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेंचं वातावरण आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याचे बनावट विवाह सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. या सर्टिफिकेटचा गैरवापर केला जाईल. तुम्ही 30 लाख रुपये द्या अन्यथा योगेश मोरे यांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करून रुपेश मोरे यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🤙 8080365706