
कोल्हापूर : होळी पौर्णिमेचे औचित्य साधून अचानक तरुण मंडळाच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीला 30,000 शेणीदान करण्यात आल्या.

तब्बल गेल्या 21 वर्षांपासून अचानक तरुण मंडळाकडून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. शहरात अनेक तालीम संस्था,तरुण मंडळे आणि उपनगरातुन या शेणी दान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद फक्त होळी पौर्णिमे पुरताच मर्यादित न राहता स्मशानभूमीत दहनासाठी किंवा रक्षाविसर्जना साठी गेल्यानंतर दानपेटीत गुप्तदानाचे अनुकरण व्हावे या उद्देशाने अनेक मंडळा कडुन दानपेटीमध्ये गुप्तदान हि करण्यात आले.प्रत्येक जबाबदार कोल्हापूरकरांनी मोफत दहन उपक्रमासाठी महानगरपालिकेला सहाय्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले.
या वेळी छ. शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, राजेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक परीक्षीत पन्हाळकर मा.परिवहन समिती सदस्य सुहास देशपांडे संस्थापक सदस्य महेश धाडणकर, विलास कुलकर्णी, गिरीश बावडेकर आणि शैलेश मोरे, ओंकार वेढे,अभिजित जोशी,संदिप पोवार, महेश कापशीकर, गौरव धाडणकर, हर्षद बावडेकर, परेश वेढे आदी उपस्थित होते.
