
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

फडणवीस यांनी केलेल्या नेत्यांच्या चौकशीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी हा टोला लगावला.नाना पटोले म्हणाले, मांजर दूध पिताना डोळे बंद करून असते, तिला वाटते मला कोणीच पाहत नाही. मांजरी सारखी डोळे बंद करून दूध पिण्याची अवस्था भाजपची झाली आहे आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र फडणवीस बोलले आहे.भाजपमध्ये गेलेले लोक कसे शुद्ध झाले आहे याची एक यादी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केली आहे. मग त्यांनी सांगायला पाहिजे की जे भाजपमध्ये गेले त्यांच्यावरची कारवाई का थांबली, असेही नाना पटोले म्हणाले.
