
मुंबई : मुंबईकर आणि कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आलिशान आणि वेगवान वंदेभारतवंदेभारत लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर चालविण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी दिले आहे.

त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांचा फायदा होणार असून त्यांचा प्रवास सेमी हायस्पीड वंदेभारतमधून सुसाट वेगाने होणार आहे. अलीकडे सीएसएमटी ते सोलापूर आणि साई नगर – शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता मुंबईकरांना हे दुसरे गिफ्ट मिळणार आहे.कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वंदेभारत चालविण्याविषयी अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात येऊन या मुंबई ते गोवा मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या शिष्ठमंडळाला दिले आहे. कोकण शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
