भुदरगड पायथ्याच्या प्राचीन बुद्ध विहाराची नोंद आर्किलाॅजी डिपार्टमेंटने त्वरित करण्याची गरज..

संवर्धन समितीची मागणी

गारगोटी : येथे भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला अखंड दगडातील एक बुद्ध विहार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांच्या संशोधनातून निदर्शनास आला. याचप्रमाणे नैसर्गिक गुंफा सुद्धा आढळल्या आहेत.

भुदरगड तालुक्यामध्ये प्राचीन दोन हजार वर्षांपूर्वीच्या बुद्ध संस्कृतीच्या खुणा सापडत असल्यामुळे इतिहास अभ्यासकांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

अलीकडेच भुदरगड तालुका बुद्ध सांस्कृतिक अवशेषाचे जतन करणारी समिती स्थापन झाली असून दर आठवड्याला उत्साही सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी मागवा घेत आहेत ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे रविवार तारीख 26 रोजी या समितीचे सदस्य सूर्योदयापूर्वीच बुद्ध विहाराला जाऊन आजूबाजूची व आतील साफसफाई केली बाहेरील बाजूच्या दगडी भिंती गवताने भरलेल्या होत्या त्या स्वच्छ केल्यावर हा गुलाबी रंगाचा कातळ असल्याचे जाणवले आजूबाजूच्या वेली वर वाढलेले गवत आणि झुडपे स्वच्छ केली. आणि बुद्ध वंदना व जिजाऊ वंदना साऱ्यांनी म्हटलीयावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉक्टर सुभाष देसाई यांनी सांगितले की भुदरगड तालुक्यामध्ये पालीच्या नैसर्गिक गुंफा भुदरगड किल्ल्याच्या तटाखालील गुंफा पाटगावचा मठ सिद्धोबाची गुहा अशा अनेक गोष्टी आपण पर्यटनाच्या दृष्टीतून तयार करूया मात्र बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण करण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत शुद्ध स्वरूपातला हिंदू धर्म पहायचा असेल तर तो बुद्ध धर्म होय बुद्ध हा साऱ्या जाती-धर्माच्या पलीकडचा होता त्याच्या धम्मामध्ये उपाली सारखा न्हावी होता तर सारी पुत्त सारखे ब्राह्मण धर्म सेनापती ही होते त्यामुळे बुद्धाला विशिष्ट जातीत बांधून ठेवू नका बुद्ध हा आजच्या युगाचा मंत्र व्हायला हवा. राजेंद्र यादव यांनी व डॉ राजीव चव्हाण, एस टी कांबळे शरद बोरवडे, एस बी शिंदे, दीपक राजरत्न यांनीही चर्चेत भाग घेतला.