राजकारणात निवृत्तीचे वय हवे, तरच तरुणांना..; उदयनराजे

नाशिक : भाजपचे खासदार उदयनराजे विविध विषयांवर बेधडक मत व्यक्त करतात. आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याची फारशी चिंता ते करीत नाहीत. आत्ताही त्यांनी राजकारणात निवृत्तीचे वय असावे असे म्हटले आहे. तरुणांना संधी केव्हा संधी मिळणार असा प्रश्न त्यांनी केला.

तरुणांनी राजकारणात यावे असे सातत्याने विविध नेते आवाहन करीत असतात. यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीत त्यामुळेच सातत्याने परिवर्तन झालेले दिसते. त्यात तरुणांना संधी मिळते. मात्र मुख्य प्रवाहात प्रस्थापित नेतेच महत्वाच्या पदांवर विराजमान असतात, ही सध्याची स्थिती आहे.महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजुर झाला. त्याबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते.

🤙 8080365706