मोठी बातमी : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वीच….

सोलापूर : दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे प्रकार चालायचे. दुसरीकडे पेपर सुरु झाल्यानंतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना पासिंगपुरते वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात. हे अनुचित प्रकार कायमचे बंद व्हावेत, हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बोर्डाने परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली आहे.बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल, पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे.

🤙 8080365706