चित्रनगरीसाठी १७ कोटी मंजूर; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार अमल महाडिक यांनी मानले आभार

कोल्हापुर: कोल्हापुरातील चित्रनगरीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी १७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. माजी आमदार अमल महाडिक यांनी वारंवार मुनगंटीवार यांच्याकडे यासाठी केलल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल त्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन विशेष आभार मानले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व सत्यजित कदम उपस्थित होते.

चित्रनगरी येथे मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असून, येत्या काळात अद्ययावत सोयी- सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. चित्रनगरीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी १७ कोटींची तरतूद करण्यात आली असून, मार्चपूर्वी या सर्व कामांच्या निविदा मंजूर करून वर्क ऑर्डर देण्यात येणार आहेत.

मा.आ. अमल महाडिक

या विकासात्मक तरतुदीमुळे कोल्हापूरच्या समृद्ध कला क्षेत्राला आणि एकंदरीतच कला क्षेत्रातील अर्थचक्राला गती प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

🤙 8080365706