सर्वांच्या सहकार्यातुन उत्तम कार्य घडवु: पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी

पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी व अरविंद काळे यांचा पोलिस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार करताना संघटनेचे अध्यक्ष बळवंत पाटील, शुभांगी पाटील, भिमराव काशिद आदी पोलिस पाटील

पन्हाळा: पोलिस अधिकारी एकटे कोणतिही गोष्ट  करु शकत नाही. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस पाटील, लोकप्रतिनिधीसह समाजातील सर्वस्तरावरील लोकांची साथ हवी असते. त्यामुळे पन्हाळा पोलिस ठाण्याच्या माध्यामतुन उत्तम कार्य घडवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन पन्हाळा पोलिस ठाण्याच्या नुतन पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले.

स्नेहा गिरी यांची शहर वाहतुक शाखेतुन पन्हाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी तर अरविंद काळे याची पन्हाळा येथुन करवीर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी बदली झाली. त्यामुळे स्नेहा गिरी यांच्यास्वागत तर काळे यांचा निरोप समारंभ पन्हाळा पोलिस ठाण्यात संपन्न झाला.यावेळी स्नेहा गिरी बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी होते.त्यापुढे म्हणाल्या की पन्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याच्यावर कारवाई मोहिम उघडली जाईल,महिलावर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालणे,पन्हाळा पर्यटन स्थळ असल्याने येथील वाहतुकीला शिस्त लावणे याकडे आपण विशेष लक्ष देणार आहे.यावेळी पन्हाळा येथुन बदलुन गेले पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दीड वर्षापासुन पन्हाळा येथे सेवा करत असताना पन्हाळावासियांसह आसपासच्या गावकऱ्यांनी भरभरुन प्रेम दिले, चांगले सहकार्य केले. जत्रा-यात्रा काळात, गणेशोत्वस, शिवजयंती उत्सव काळात, ग्रामपंचायत निवडणुका काळात सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांसह विविध विभागाने  आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडल्याने कोणताही गालबोट पन्हाळा पोलिस ठाण्याला लागला नाही. सत्याला सत्य व खोट्याला खोट बोलण्याची धमक ही पन्हाळ्याच्या ऐतिहासिक भुमीत आहे.

त्यामुळे करवीरला बदली होवुन देखील पन्हाळ्यात बोलावुन निरोप समारंभात सत्कार करण्यात आल्याने आपण पन्हाळ्यात केलेल्या कामाची ही पोचपावती आहे.पन्हाळकरांनी जे प्रेम दिले ते कधीही विसरता न येणारे आहे.यामुळे पुढील कार्यासाठी आपल्याला दहाहत्तीचे बळ मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी पन्हाळा नगरपरिषद व नागरिकांच्यावतीने पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी व अरविंद काळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पन्हाळा पोलिस पाटील संघटना  यांच्यावतीने अरविंद काळे व स्नेहा गिरी यांचा फेटा बांधुन तसेच शालश्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, असिफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, चैतन्य भोसले, जीवन पाटील, रमेश स्वामी, दिनकर भोपळे, भिमराव काशीद, पन्हाळा तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बळवंत पाटील, माजी अध्यक्ष भिमराव काशिद, शुभांगी पाटील यांच्यासह पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सुत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश ठाणेकर यांनी केले.

🤙 8080365706