भारतीय शेअर बाजारात आज घसरण….

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज सकाळी सेनेक्स निफ्टीने स्थिर सुरुवात केली. मात्र, दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार बंद होण्याच्या वेळी सेन्सेक्सने खालच्या दिशेने जात जवळपास 220 अंकांनी घसरला.

तर निफ्टी देखील 100 अंकांनी खाली आला. बाजार बंद होताना 17,710 वर ट्रेड करत होता. अखेरीस NSE निफ्टी 50 43.10 पॉइंट्स म्हणजेच 0.24% घसरून 17,721.50 वर आला. तर बँक निफ्टीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहिला. बाजार बंद होताना बँक निफ्टी 100 अंकांनी वधारला.सकाळी तब्बल 3 टक्क्यांनी घसरलेले टाटा स्टीलचे समभाग दुपारी साडेबाराच्या सुमारास 5 टक्क्यांनी वधारले. तर अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्सही वधारले. मात्र अदानी पोर्ट्सचे एकूण नफा 12 टक्क्यांनी कमी झाला तर स्टॉक फक्त 2 टक्क्यांनी वधारले. तर अंबुजा सिमेंटने चांगली कामगिरी करत अंबुजा सिमेंटचे समक्षाग 2 टक्क्यांनी वधारले.

🤙 8080365706