राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत करण अदानी…

मुंबई: राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत गौतम अदानी यांचे सुपुत्र करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे.

या समितीत रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचादेखील समावेश आहे.या समितीचं नेतृत्त्व टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन करतील. अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडचे सीईओ म्हणून करण अदानी कार्यरत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानं अदानी समूहाला हादरा दिला आहे. हिंडेनबर्गच्या १०६ पानी अहवालानं अदानी समूहाच्या व्यवहारांवर, कारभारांवर बोट ठेवलं. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स तब्बल ६० टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी समूहाचं भागभांडवल निम्म्यानं घटलं आहे. अदानी समूहासाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे. एकापाठोपाठ एक संकटं येत असताना महाराष्ट्रातून अदानींसाठी महत्त्वाची बातमी आहे.

🤙 8080365706