काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

पुणे: कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूकिसाठी काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना कसब्यातून पाहायला मिळणार आहे.नाना पटोले यांनी ट्विट करून रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. उमदेवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे धंगेकर आजच हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं धंगेकर यांनी सांगितलं.

🤙 8080365706