ईडीकडून सुटका झालेल्या अधिकाऱ्यांचे कोल्हापुरात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत

कोल्हापूर : ईडीकडून तब्बल 70 तासांनी सुटका झाल्यानंतर कोल्हापुरात परतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर शहरातील शाखेतील कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखरे विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर, व निरीक्षक राजू खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

🤙 8080365706