
कागल : कागल तालुक्यात विकासकामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे, कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

नियोनबध्द आराखडा तयार करून कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदार संघातील विकासकामे मार्गी लावली असताना केवळ पक्षाची सत्ता आल्याने उद्घाटने करून श्रेय लाटण्याचे उद्योग बंदकरा, असेही ते म्हणाले.
म्हाकवे ता. कागल येथे जलजीवन पाणी पुरवठा योजनेतून चार कोटी, ८४ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन खुदाईच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य ए.वाय.पाटील-म्हाकवेकर होते. आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, जे साधे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत त्यांना विकासकामांची उद्घाटने करून श्रेय घेण्याची घाई झाली आहे. गेल्या ३० वर्षात आपण केलेल्या कामामुळे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले.
यावेळी रमेश पाटील, सिद्राम गंगाधरे, नितीन पाटील, सदाशिव गोरे, सुनील पाटील, जी .एस .पाटील, एच.एन.पाटील, निवास पाटील, आकाराम पाटील, विलास पाटील, विश्वनाथ पाटील, एस. के. पाटील, जीवन कांबळे, विजय पाटील, चंद्रकांत कांबळे, अंजना पाटील, सुजाता कुंभार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. के. आर. पाटील यांनी आभार मानले.
“आता लढाई अपरिपक्व, अडाणी व्यक्तीशी…….” महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन आपणच करणार, अशी वक्तव्य कागलमधील काही मंडळी करत आहेत. राजकारणात प्रोटोकॉल असतात. याची जाणीवच नसणाऱ्या अज्ञानी, अडाणी आणि अपरिपक्व व्यक्तींशी आता आपल्याला लढाई करावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहनही आमदार मुश्रीफ यांनी केले.
