हिंदूमधील धर्म संकल्पनेमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली; ऋषी सुनक

दिल्ली: ब्रीटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.तसेच धर्म म्हणजे काय? याबाबतही त्यांनी भाष्य केले. तसेच हिंदूमधील धर्म संकल्पनेमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकीत लिझ ट्रस यांच्याकडून पराभव झाल्यानंतर मी थोडा निराश झालो होतो. या पराभवानंतर माझी राजकीय कारकीर्द संपली, असे मला वाटत होते, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली. त्यानंतर पुन्हा निवडणूक लढण्याची प्रेरणा कशी मिळाली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले’हिंदूंमध्ये ‘धर्म’ नावाची एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ ‘कर्तव्य’ असा होतो. कोणतंही काम प्रामाणिकपणे करणे हे आपलं कर्तव्य आहे. लहानपणापासून माझ्यावरही हेच संस्कार झाले आहेत. एकंदरीतच आपल्याकडून अपेक्षित असलेले काम प्रमाणिकपणे करणं, त्यालाच ‘धर्म’ असे म्हणतात,त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले.

🤙 8080365706