न्यू पॉलिटेक्निकला एनएसडीसीच्या कार्सेसची आणि एमसीईडीच्या केंद्राची मान्यता

कोल्हापूर : शतकमहोत्सवी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकला ‘राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)’ कडून ‘ज्युनियर साॅफ्टवेअर डेव्हलपर’ व ‘मल्टीस्किल टेक्निशियन (इलेक्ट्रीकल)’ या दोन कोर्सच्या मानांकनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.

त्याचबरोबर ‘महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)’ कडून ‘टु व्हिलर रिपेअर ॲन्ड मेन्टेनन्स’ या कोर्ससाठी ‘अधिकृत प्रशिक्षण केंद्र’ मिळाल्याचे प्रमाणपत्र एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना प्रदान केले.

यावेळेस एमसीईडीचे परिक्षेत्र अधिकारी उमाप, प्रकल्प अधिकारी वनिता पाटील उपस्थित होते.

एनएसडीसीच्या ‘ज्युनियर साॅफ्टवेअर डेव्हलपर’ व ‘मल्टीस्किल टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) या दोन्ही तीन महिने प्रशिक्षण कालावधी असलेल्या कोर्सेसच्या प्रत्येकी ३० जागा तर एमसीईडीच्या ‘टु व्हिलर रिपेअर ॲन्ड मेन्टेनन्स’ या सहा महिने कालावधी असलेल्या कोर्सच्या २० जागा उपलब्ध आहेत. वरील सर्व कोर्सेससाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.हे कोर्सेस आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून होतकरू तरूणांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्ये विकसित करून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि कोर्स पूर्ण झाल्यावर उमेदवारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक पाठबळ दिले जाणार आहे, असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले.

एनएसडीसीच्या कोर्सेसच्या मान्यतेसाठी समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी आणि एमसीईडीच्या प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार खजाननीस वाय. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 8080365706