आज सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे 2023-24 चा अर्थसंकल्प आज शनिवारी सादर केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तर मुंबई महापालिकेच्या बजेटवर यंदा राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची देखील चर्चा देखील रंगली आहे. आता मुंबईकरांना या बजेटमधून नेमक्या काय अपेक्षा आहेत? अनिता अपेक्षा पूर्ण होणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.

🤙 8080365706