
सोलापूर : इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा माध्यमिक बोर्डाने ठोस पाऊल उचलत दक्षता समितीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा काळात वाढीव भरारी पथके नेमली जाणार असून त्यात पोलिस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज ते पथक जाईल, हा त्यामागील हेतू आहे. दरम्यान दहावी- बारावी परीक्षांवर ‘दक्षता पथका’चा वॉच राहणार असून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.परीक्षेदरम्यान ‘रनर’कडे व्हिडिओ रेकॉर्डिंची जबाबदारी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात नऊ हजार केंद्रे असून त्याअंतर्गत जवळपास ३२ लाख विद्यार्थी परीक्षा देतील. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी पुणे बोर्डाने यंदा लोकांकडून सूचना तथा अभिप्राय मागविले होते. जवळपास पावणेतीनशे लोकांनी बोर्डाकडे सूचना पाठवल्या.त्यानुसार आता बोर्डाने दोन प्रस्ताव तयार केले असून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवले आहेत. दोन दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. परीक्षांवर वॉच ठेवण्यासाठी दरवर्षी बैठे पथक, भरारी पथके नेमली जात होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकाची मदत भरारी पथकांसाठी घेतली जाणार आहे.
