कोरेगाव तालुक्यात दारू अड्डा चालविणाऱ्यास महिलांनी दिला चोप….

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूचा अड्डा चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला.यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व साहित्य व बाटल्या फोडून टाकल्या.

चिलेवाडी- भाडळे चौक मध्यवर्ती आहे. वर्दळीच्या या चौकापासून भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी (भाडळे), धनगरवाडी आदी गावे वाड्या हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे या चौकात परिसरात ग्रामस्थ, वाहनांची कायम वर्दळ असते. या चौकात सुमारे वर्षापूर्वी एक व्यक्तीने पत्र्याचे शेड टाकून खाद्य पदार्थ विक्रीचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून मालकाने या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या देशी- विदेशी दारूविक्री सुरू केली होती. त्यामुळे परिसरातील गावे- वाड्यांतील ग्रामस्थांसह युवक वर्गाची दारू पिण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. घरातून बाहेर पडलेले लोक सकाळपासून या चौक परिसरात दारू पिऊन काही वेळी रस्त्यात पडत असत. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या.

🤙 8080365706