
कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रवचनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.जुना राजवाडा पोलिसांत या बाबतचा गुन्हा नोंद झाला आहे.पोलीस याचा तपास घेत आहेत.
राजेंद्रनगर येथील स्नेहल जंगट यांचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तर जुने चावरे येथील मीना देशपांडे यांचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अज्ञातांनी लंपास केल्याचे समजत आहे.
