सिद्धगिरी जननी आयव्हीएफचे रविवारी लोकार्पण

कोल्हापूर : काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या निराधार यांना आधार या तत्त्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ सेवा सुरू आहे़. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने पश्चिम महाराष्ट्रातील एन. ए .बी. एच. मानांकित सेवाभावी मल्टी स्पेशालिस्ट अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्त्वावर सिद्धगिरी जननी या आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू होत आहे. त्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रांगणात होणार आहे असे डाॅ.वर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले ,विविध मान्यवर व पाच हजार महिलांच्या उपस्थितीत होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले .

काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मदाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या चाचण्यासह एकाच छताखाली आयव्हीएफ सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ही सेवा रुग्णालयाच्या ना नफा ना तोटा या तत्वानुसार इतरत्र असणाऱ्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागाकरिता कर्नाटकाच्या जोल्ले परिवाराने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

यावेळी डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, सिद्धगिरी जननी विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता इतर खाजगी केंद्राच्या तुलनेत 1/5 इतक्या कमी खर्चात इतक्या कमी खर्चात ही सेवा दांपत्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत कमी शुक्राणूंच्या संख्येसाठी इंट्रा सायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच क्रोनिक पीसीओडी किंवा खूप कमी AMHसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने येथे उपचार करण्यात येतील. तसेच तरुण जोडण्यासाठी बेसिक इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन (IUI)ही उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक दांपत्याला सुरुवातीलाच उपचार प्रक्रियेची सर्व माहिती पारदर्शकपणे दिली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश भरमगौडर, धनंजय जाधव, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सागर गोसावी यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706