गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा; पुणे पोलिसांची योजना

पुणे : पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे. गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे.

1) शस्त्र अधिनियम कलम 3, 25 नुसार कारवाई केल्यास 10 हजार रुपये बक्षीस

2) शस्त्र अधिनियम कलम 4, 25 नुसार कारवाई केल्यास 3 हजार रुपये बक्षीस

3) फरार आरोपीला पकडल्यास 10 हजार रुपये बक्षीस

4) पाहिजे आरोपीला पकडल्यास 5 हजार रुपये बक्षीस

5) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि. मोका कारवाई केल्यास 5 हजार रुपये बक्षीस

6) महा. धोकादायक व्यक्ती इ. चे विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या 5 हजार रुपये बक्षीस

7) महा पोलीस कायदा कलम 55 नुसार कारवाई केल्यास दोन हजार रुपये

8) महा पोलीस कायदा कलम 56/57 नुसार कारवाई केल्यास 1 हजार रुपये बक्षीस

पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केल्यास वरील प्रकारची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.

🤙 8080365706