मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक ; ५० आमदार मुंबईला रवाना

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाच्या सर्व ४० आमदारांसह १० अपक्ष आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व ५० आमदारांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.

राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. बैठकीचा अजेंडा गोपनीय ठेवला गेल्याने राजकीय वर्तूळात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्हे कुणाचे यावर निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. शिंदे आणि ठाकरे गटाकडून आयोगाकडे लेखी युक्तिवाद मांडण्यात आला आहे. युक्तिवादावरून आराखडे बांधले जाऊ लागले आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यातच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच आपल्याला अटक होणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीसंदर्भात मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.

🤙 8080365706