कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या सौदर्यांत भर घालणारा आणि महापुरात संपर्क तुटू नये यासाठी प्रस्तावित असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले . या बास्केट ब्रिजमुळे कितीही पाऊस आला, तरी कोल्हापूरची वाहतूक विस्कळीत होणार नाही, वाहतूक थांबणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.या शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजेत, शहर सुंदर झालं पाहिजे, मार्केट झालं पाहिजे, तसेच कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल इतकी ताकद असल्याचेही ते म्हणाले.

मी दिल्लीत राहिलो की मला कफ होतो, पण इथं तीन दिवस राहिलो, पण काही त्रास झाला नाही. दिल्लीत राहणं म्हणजे आयुष्य कमी केल्यासारखं आहे.

त्यामुळे वातावरण प्रदूषण विरहित झालं पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या खासदारांनी जास्तीतजास्त प्रयत्न करावेत. आपल्याला निरोगी जीवन प्राप्त झालं पाहिजे, असा श्वाश्वत विकास झाला पाहिजे, तरंच कोल्हापूर स्मार्ट सिटी होईल. माझ्या विभागाकडून जेवढी मदत करता येईल, तेवढी मी करेन, असेही त्यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्यामध्ये राज्य सरकारची चारशे एकर जागा आहे. ती जागा मिळाल्यास आयात, निर्यात कोल्हापुरातून सुरू होईल. त्यासाठी समुद्र शोधण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांना अन्नदातासोबत तुम्ही उर्जादाताही बनवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणातून कोल्हापूर शहरातील अन्य ठिकाणी सध्या उड्डाणपूलाची गरज आहे याची माहिती दिली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, या संदर्भात जर नगरोत्थान योजनेतून जमीन उपलब्ध करून दिल्यास मी नक्कीच याबाबत विचार करेन, असे सांगितले. महाडिक यांनी जी यादी दिली आहे ती त्याचा डीपीआर बनवण्यास सांगितल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

🤙 8080365706