
कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अलोट गर्दी ही मेरी वेदर मैदानावर केली होती.


प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरत आहे.याचबरोबर गाय आणि बैल या दोन्हीचा संगम असणारी खिलार जातीचा बैजा नावाचा पाच वर्षाचा पांढरा बैल व हरियाणा जातीची रेडी जी ३३ महिन्याची आहे मुऱ्हा जातीची १९ लिटर दूध देणारी म्हैस रावण नावाचा लाल कंधारी वळू जो नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील आहे ज्याने महाराष्ट्र चॅम्पियन दोन वेळा पटकावला आहे. तर अन्य स्पर्धांमध्ये त्यांने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. सर्जा नावाचा कपिला गीर आठ वर्षे सहा महिन्याचा दोन दाती बैल आहे जो कोपर्डी तालुका आजरा येथील आहे.
८ लाख ५१ हजार किंमत असलेली १८.१ लिटर दूध देणारी पाच वर्षे वयाची मुऱ्हा जातीची म्हैस, इतर खोंड, जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे उंदीर, व ७० व ५० किलो वजनाचा उस्मानाबादी बकरा, कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर, पपेट,पांढरे उंदीर ससे बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.शिवाय ऊस पिकावर ड्रोन द्वारे फवारणी हेही आकर्षण ठरत आहे.
प्रदर्शनात दोन दिवसात झाली ५ कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे. यावर्षीचे प्रदर्शनाचे १४ वर्ष असून चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर मोठी गर्दी केली आहे.
*आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षनिमित्त तृणधान्य*
येथील मेरी वेदर मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केलेल्या मिलेटचे (तृणधान्य) याचे स्वतंत्र दालन उभे कटण्यात आले आहे.ज्यात प्रथम मिलेटिइयरमध्ये ४० स्टॉल आहेत. जे.आय मानांकन असणारे पदार्थ व लाल कांदा, आजरा घनसाळ तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम, हळद आदी पहायला मिळत आहे.केळीच्या बुध्दांपासून पदार्थ बनविणारी गुजरात मधील कंपनी रेशीम कोष याची माहितीही पहावयास मिळत आहे.हायड्रोफोनिक चारा असणार आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत.हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.व याची खरेदी शेतकरी वर्ग करत आहे.*मोफत झुणका भाकरीची सोय*भागीरथी महिला संस्थेमार्फत येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात आले विक्रम नगर येथील महालक्ष्मी महिला बचत गट यांनी ५००० भाकरी व झुणका वाटप करण्यात आल्या रोज प्रत्येक बचत गटांना संधी सौ अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.यावेळी मंगल ताई महाडिक साधना महाडिक मंगलताई महाडिक इंद्रजित जाधव प्रमोद हुदले आदी उपस्थित होते.
