
मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असताना दिसत आहे. आता राज्यात आज व उद्या (29 जानेवारी) काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर कोकण व विदर्भात थंडीचा जोर कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांत मागील 3 ते 4 दिवसांत पाऊस झाला असून काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले असून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या बदलत्या हवामानामुळे आता शेतकरी चिंतेत आहे.
