
बालिंगा/मोहन कांबळे
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत घरे बांधताना काही कमी पडले तर मी व आमदार ऋतुराज पाटील ठामपणे आपल्या पाठीशी आहे. असे उदगार बोंद्रे नगर येथील 77 युनिट चे भूमिपूजन समारंभात आमदार सतेज यांनी व्यक्त केले.

बोंद्रे नगर येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत असून सदर योजना करीता कै.महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केले असून याचे माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ७७ कुटुंबांचे या योजनेअंतर्गत पुनर्वसन होणार आहे.
सदर कामाचे भूमिपूजन समारंभ आज सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला.सदर कार्यक्रमास आमदार ऋतुराज पाटील ,शेल्टर असोसिएट पुण्याच्या संचालिका सौ प्रतिभा जोशी माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे पंडितराव बोंद्रे ,शहर अभियंता पाटील व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पुनर्वसन कुटुंब व नागरिक उपस्थित होते.
